
मंडळी, लहान वयातच मुलांच्या डोक्यावर पांढरे केस दिसू लागले, तर अनेक पालक घाबरतात. काहीजण तेल लावतात, तर काही घरगुती उपाय करतात. पण या पांढऱ्या केसांमागचं खरं कारण तुम्हाला माहितीये का ? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, लहान मुलांचे केस पांढरे होण्यामागे तीन प्रमुख कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे अनुवंशिकता. कुटुंबात कमी वयात केस पांढरे होण्याचा इतिहास असेल, तर मुलांमध्येही असं दिसू शकतं.
दुसरं म्हणजे शरीरात व्हिटॅमिन बी-१२, लोह आणि फोलेट यांसारख्या पोषक घटकांची कमतरता. मग पालकांनी काय करावं? तर, मुलांच्या आहारात डाळी, अंडी, दूध, दही, पनीर, पालेभाज्या आणि कडधान्यांचा समावेश करा.
मात्र, केवळ आहार बदलल्याने पांढरे केस पुन्हा काळे होतीलच, याची खात्री नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना सप्लिमेंट्स देऊ नका किंवा केसांना केमिकल डाय लावू नका.
पांढरे केस वाढत असतील किंवा मुलाला थकवा, अशक्तपणा जाणवत असेल, तर बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. माहिती आवडल्यास हा व्हिडीओ इतरांना शेअर करा.





