Latest

क्षणात झालं होत्याचं नव्हतं ! शनिदर्शन ठरलं शेवटचं…; नेवासे तालुक्यात सियाझ कारला भीषण अपघात; तीन शनिभक्तांचा मृत्यू !

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या प्रवासावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

नेमक घडलं काय ? सांगतो. आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, नेवासे तालुक्यातील घोडेगाव परिसरात शनिभक्तांची सुझुकी कंपनीची सियाझ कार थेट पाटात गेल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात तीनपेक्षा जास्त शनिभक्तांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सोनई पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघाताची बातमी समजताच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या काही भाविकांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

जखमींवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती समोर येणं बाकी आहे. घटनेची माहिती मिळताच सोनई पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. अपघात नेमका कसा घडला आणि कारमध्ये किती जण होते, याचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button