
पारनेर, निघोज आणि परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्याला जाण्यासाठी आता प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. कारण पारनेर-निघोज-पुणे ही एसटी बससेवा १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या बससेवेचा रूट आणि वेळापत्रक कसे असणार? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, ही बस सकाळी ७ वाजता पारनेर आगारातून सुटणार असून, सकाळी ७.१५ वाजता निघोज बसस्थानकावर तिचं स्वागत केलं जाणार आहे. तर पुण्यातील शिवाजीनगर आगारातून सायंकाळी ५ वाजता परतीची बस सुटेल.
या बसचा मार्ग चिंचोली, वडझिरे, देवीभोयरे, निघोज, कुंड पर्यटनस्थळ, टाकळी हाजी, रांजणगाव गणपती, शिक्रापूर आणि वाघोलीमार्गे पुणे असा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
म्हणजेच निघोजकरांसाठी १ डिसेंबरचा दिवस खास ठरणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला ही बससेवा किती उपयोगी वाटते? कमेंट करून नक्की सांगा.





