Latest

अहिल्यानगर, बीड, सांगलीसह ‘हे’ पाच जिल्हे फ्लॅश ड्राऊटच्या छायेत ! नव्या संशोधनाने चिंता वाढवली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कारण आता दुष्काळाचा धोका केवळ पाऊस कमी पडण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर अवघ्या काही आठवड्यांत हिरवीगार शेती कोरडी पडू शकते. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘फ्लॅश ड्राऊट’ म्हणजेच अचानक येणारा तीव्र दुष्काळ म्हणतात. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी एका नवीन संशोधनानुसार अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सांगली आणि सोलापूर हे पाच जिल्हे यासाठी सर्वाधिक संवेदनशील ठरले आहेत.

१९८१ ते २०२४ या ४४ वर्षांतील पाऊस, तापमान आणि जमिनीतील ओलाव्याचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
विशेषतः उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याआधीचा काळ अधिक धोकादायक आहे. कमी पाऊस आणि वाढते तापमान यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो.

मात्र, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे आयआयटी मुंबईचे ‘कृषी ड्राऊट’ पोर्टल चार आठवडे आधीच दुष्काळाचा इशारा देऊ शकते. तर मग मंडळी तुम्हाला या अभ्यासाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button