Latest

हवामानात अचानक मोठा बदल… महाराष्ट्रातील ‘या’ पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवा अंदाज चर्चेत!

महाराष्ट्रातील हवामान सध्या चांगलंच बदलताना दिसत आहे. कुठे थंडीचा कडाका जाणवतोय, तर कुठे पावसाचे ढग जमा होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. कसा आहे हवामान खात्याचा नवा अंदाज? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24ला फॉलो नक्की करा.

मंडळी, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या काही भागांत आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे जळगाव आणि नाशिकमध्ये थंडीचा जोर कायम आहे. पहाटे आणि रात्री गारठा जाणवत असला, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका बसण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातही रात्री थंडी जाणवणार असून दिवसभर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. आधीच दुष्काळाचे संकट आणि त्यात हवामानाचे बदल यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते. तर मग मंडळी तुमच्या जिल्ह्यात थंडी आहे की पाऊस? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button