Latest

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याचा हल्ला आणि त्यानंतर… नेमकं काय घडलं? श्रीरामपूरमध्ये बिबट्याची दहशत

रात्रीच्या अंधारात दुचाकीवरून घरी परतणाऱ्या दोघांवर अचानक बिबट्याने झडप घातली ! श्रीरामपूर तालुक्यातील भोकरमध्ये नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, भोकर शिवारात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. साहिल आहेर आणि सागर लोखंडे हे दोघे ऊसतोडीचे काम आटोपून दुचाकीने घरी जात होते.

माणिकदेव रस्त्यावरील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. दोघेही दुचाकीसह खाली कोसळले. बिबट्याने साहिलच्या पाठीवर पंजा मारल्याने तो गंभीर जखमी झाला. तर दुचाकी अंगावर पडल्याने सागरच्या हाताला, डोक्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली.

दोघांना आधी श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. विशेष म्हणजे तीन महिन्यांत दुचाकीस्वारांवरील हा तिसरा हल्ला आहे.

वनविभागाने पिंजरे लावून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा भोकर स्टँडवर रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तर मग मंडळी तुमच्या मते वनविभागाने आता काय करायला हवं? कमेंट करून नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button