
पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. टोयोटाने भारतात अशी इनोव्हा लॉन्च केलीय, जी तब्बल ८५ टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर धावू शकते.
विशेष म्हणजे, ही देशातील पहिली E85 फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड इनोव्हा हायक्रॉस आहे. मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत ही कार लॉन्च झाली. या गाडीची किंमत आणि फिचर्स कसे आहेत? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24ला फॉलो नक्की करा.
मंडळी, या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे E20 ते E85 इंधनावर चालण्याची क्षमता. म्हणजेच ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोल असलेल्या इंधनाचाही वापर करता येणार आहे. सोबतच हायब्रिड तंत्रज्ञानामुळे ही कार काही परिस्थितींमध्ये इलेक्ट्रिक मोटरवरही धावू शकते.
फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर १२.३ इंच टचस्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि JBL साऊंड सिस्टम मिळते. या इनोव्हाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आहे १९.९९ लाख रुपये, तर टॉप व्हेरिएंटची किंमत ३१.९९ लाख रुपये आहे. तर मग मंडळी, तुम्ही ही इथेनॉलवर चालणारी इनोव्हा खरेदी कराल का? कमेंटमध्ये नक्की सांगा!





