
अहिल्यानगर जिल्ह्यातील चणेगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीये. प्रवरा नदीवरील वसंत बंधाऱ्यात बुडालेल्या ३५ वर्षीय सतीश वाणी यांचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी शोध पथकाच्या हाती लागलाय. मात्र, या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. नेमक काय घडलं? सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
सतीश आप्पासाहेब वाणी हे झरेकाठी येथील रहिवासी होते. ते बंधाऱ्यात बुडाल्यानंतर अहिल्यानगरमधील रेस्क्यू टीम, राहुरी, राहाता आणि श्रीरामपूर येथील अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांनी सलग तीन दिवस शोधमोहीम राबवली. अखेर त्यांचा मृतदेह सापडला.
दरम्यान, सतीश यांचे भाऊ संतोष वाणी यांनी पत्नी, सासरच्या काही व्यक्ती आणि इतरांवर मारहाण, मानसिक छळ आणि धमकावल्याचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्याचं सांगितलंय.
सतीश यांच्या मोबाइलमध्ये संबंधित पुरावे आणि रेकॉर्डिंग असल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप करत त्यांनी कारवाईची मागणी केलीय. या प्रकरणात तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.





