Latest

कर्जमाफीच्या ३ याद्या आल्या, मग ५० हजारांचं अनुदान कुठे अडकलं ? समोर आली मोठी अपडेट

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ! कर्जमाफीच्या तीन याद्या जाहीर झाल्या, पण नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातील ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. मग हे अनुदान नेमकं रखडलं तरी कुठे?

मंडळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप या लाभाची प्रतीक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकरदात्यांना योजनेतून वगळण्यासाठी अधिकृत माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील नाव, जन्मतारीख आणि आधार जोडणीसंबंधी त्रुटींमुळेही पैसे जमा होण्यात अडचणी येत आहेत.

हवामानातील बदल, उत्पादन खर्च आणि दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लवकर मिळावं, अशी मागणी होत आहे. आता शासन या रखडलेल्या अनुदानाबाबत निर्णय कधी घेणार, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button