Latest

जामखेडमध्ये जिल्हा बँकेचा सस्पेन्स…राळेभात बंधूंपैकी कोण माघार घेणार ?

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेडमधील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघात तीन उमेदवारी अर्ज दाखल झालेत. त्यामुळे राळेभात बंधू विरुद्ध सचिन घुमरे, अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमोल राळेभात आणि सुधीर राळेभात यांनी अर्ज भरलेत. तर राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सचिन घुमरे मैदानात उतरलेत.

पण खरी गोम इथेच आहे! राळेभात बंधूंपैकी नेमकी कोणाची माघार होणार? विद्यमान संचालक अमोल राळेभात पुन्हा संधी मिळवणार, की सुधीर राळेभात निवडणूक लढवणार?

दुसरीकडे, राम शिंदेंनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे घुमरेंना त्यांच्या समर्थकांची किती साथ मिळणार, याकडेही लक्ष आहे.

आता २१ ऑक्टोबरच्या माघारीनंतरच जामखेडमधील राजकीय चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button