Latest

प्रवरा कॅनॉलचे पूर्ण अस्तरीकरण होणार का ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टच सांगितलं !

प्रवरा कॅनॉलचं अस्तरीकरण होणार, त्यामुळे दोन महिने पाणी मिळणार नाही, अशी चर्चा सुरू होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम मिळणार का? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरमधील पंचायत आढावा बैठकीत याबाबत मोठं स्पष्टीकरण दिलंय.

ते म्हणालेत की, प्रवरा कॅनॉलचं संपूर्ण काँक्रिटीकरण किंवा अस्तरीकरण होणार असल्याचा गैरसमज काही लोकांनी पसरवलाय. मात्र, कॅनॉलची सद्यस्थिती बदलण्याचा कोणताही निर्णय नाही.

प्रवरा कॅनॉलची लांबी ७६ किलोमीटर असून, त्यापैकी केवळ ८ किलोमीटरच्या भागात अस्तरीकरण केलं जाणार आहे. तेही मोऱ्यांच्या मजबुतीकरणासाठी आणि आवश्यक संरचनात्मक कामांसाठीच आहे.

त्यामुळे संपूर्ण कॅनॉलचं अस्तरीकरण होणार नाही. तसेच, यामुळे दोन महिने पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली.

प्रवरा कॅनॉल आहे तसाच राहणार असल्याचं विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता या स्पष्टीकरणानंतर शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button