Latest

महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; अहिल्यानगरमध्ये काय स्थिती?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बदलताना दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नेमका कुठे पाऊस पडणार आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हवामान कसं राहणार, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

मंडळी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या भागांत पावसाची शक्यता आहे.

धाराशिव जिल्ह्यालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे.

दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये प्रामुख्याने कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्येही पावसाचा विशेष इशारा नाही.

महत्त्वाचं म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवावं आणि स्थानिक हवामान विभागाच्या सूचनांनुसार नियोजन करावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button