Latest

सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी… आता ऑनलाइन औषध विक्रीही बंद होणार का ? काय आहे नवीन अपडेट…

सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर आता आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासमोर आणखी एक मोठी मागणी आली आहे. ही मागणी थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे औषध विक्रीच्या क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशनने ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय काही औषधांची विक्री होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे, केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळायला हवीत अशी काही औषधंही ऑनलाइन विकली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बनावट प्रिस्क्रिप्शन, औषधांचा गैरवापर आणि नागरिकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासोबतच या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

यापूर्वीही ऑनलाइन औषध विक्रीविरोधात देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. आता पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र, ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची पुढची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button