Latest

२६ तासांचा प्रवास १४ तासात… अहिल्यानगर जिल्ह्यातुन जाणार ५ राज्यांना जोडणारा ९०० किमीचा ‘हा’ सुपर एक्स्प्रेसवे !

नाशिकहून चेन्नईला जाण्यासाठी लागणारे २४ ते २६ तास आता १२ ते १४ तासांवर येणार आहे. कारण महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी एक्स्प्रेसवे उभारण्याची योजना आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यालाही होणार आहे.

नाशिक ते चेन्नईदरम्यान प्रस्तावित असलेला हा सहा पदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांना जोडणार आहे.

या मार्गामुळे आंतरराज्यीय प्रवास अधिक वेगवान होण्यासोबतच व्यापार आणि मालवाहतुकीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात हा मार्ग नाशिकमधून सुरू होऊन अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतून अक्कलकोटच्या दिशेने जाणार आहे. त्यानंतर हा मार्ग कर्नाटकात प्रवेश करेल. महाराष्ट्रातील या प्रकल्पासाठी सुमारे ३७४ किलोमीटरच्या मार्गावरील ९० टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे.

सध्या नाशिक ते चेन्नई हे अंतर सुमारे १,४०० किलोमीटर असून, नवीन मार्गामुळे जवळपास ४०० किलोमीटर अंतर कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button