Latest

ही तर भीषण दुष्काळाची चाहूल ! अहिल्यानगरमध्ये २.१८ लाख लोकांची तहान टँकरवर, ‘या’गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरु

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने पुन्हा ओढ दिल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई गंभीर होत चालली आहे. सध्या जिल्ह्यात तब्बल ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, १०८ गावे आणि ५७५ वाड्या-वस्त्यांमधील २ लाख १८ हजार ११४ नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

यामध्ये पाथर्डी तालुक्याची परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक असून, तब्बल ५४ टँकर सुरू आहेत. त्यानंतर नगर तालुक्यात १९, शेवगावमध्ये १४ आणि कर्जतमध्ये ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. संगमनेरमध्ये ६, पारनेर आणि जामखेडमध्ये प्रत्येकी ४, तर नेवाशात १ टँकर सुरू आहे.

जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिल्यानंतर जुलैअखेरीस काहीसा दिलासा मिळाला. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने विहिरी, बोअरवेल आणि पाझर तलावांची पाणीपातळी अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. आता सर्वांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button