Latest

डोक्यावर गोल टोपी, समोर गणपती बाप्पा अन् ओठांवर ‘सुखकर्ता दुःखहर्ता’… मनोलीतील मुस्लिम कुटुंबाच्या गणेशभक्तीची जिल्ह्यात चर्चा !

मनोली गावातील एकमेव मुस्लिम कुटुंब असलेल्या भैयाच्या कुटुंबाने पुन्हा एकदा माणुसकीची सुंदर मिसाल घालून दिली. गावातील गणपतीच्या आरतीला भैयासह त्यांचं संपूर्ण कुटुंब सहभागी झालं.

डोक्यावर गोल टोपी, समोर गणपती बाप्पा… पण गावकऱ्यांसाठी हे दृश्य अजिबात वेगळं नव्हतं. कारण मनोलीत सण हा केवळ धर्माचा नसतो, तर तो संपूर्ण गावाचा असतो. भैयाचे वडील शब्बीरभाई हे गावातील प्रत्येक पोराचे लाडके चाचा होते.

शाळेजवळ बसून मुलांची विचारपूस करणं आणि अननसाच्या गोड सरबताने त्यांचं स्वागत करणं, त्यांच्या आठवणी आजही गावकऱ्यांच्या मनात आहेत. आज शब्बीरभाई नसले, तरी त्यांचं प्रेम आणि आपुलकीचं नातं कायम आहे.

गावातील सुख-दुःखात भैयाचं कुटुंब सहभागी होतं आणि गावही त्यांच्या कुटुंबासाठी तितकंच उभं राहतं. मनोलीचा संदेश अगदी स्पष्ट आहे…धर्म वेगळे असू शकतात, पण माणुसकी एकच असते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button