Latest

रावणाला जाळत नाहीत, उलट पूजा करतात… ; महाराष्ट्रातील ‘या’ गावात दसऱ्याच्या दिवशीच होते रावणाची विशेष पूजा !

देशभरात दसऱ्याला रावणाचं दहन केलं जातं. पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे, जिथं रावणाला जाळलं जात नाही, तर त्याची पूजा केली जाते ! आणि ही परंपरा आजची नाही, तर तब्बल ३०० वर्षांपासून सुरू आहे. नेमक कुठे आहे हे गावं? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील सांगोळा गावात दसऱ्याचं चित्रच वेगळं असतं. देशभरात रावणदहनाची तयारी सुरू असताना, इथं मात्र ‘लंकेशाय नमः’ आणि ‘लंकाधीश राजा रावण महाराज की जय’ असा जयघोष घुमतो.

गावात काळ्या पाषाणातील रावणाची भव्य दशमुखी मूर्ती आहे. या मूर्तीला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा आहे. दरवर्षी दसऱ्याला या मूर्तीचं विशेष पूजन केलं जातं आणि महाआरतीही होते.

पण प्रश्न असा आहे की, रावणाची पूजा का केली जाते? ग्रामस्थांच्या मते, रावण केवळ लंकेचा राजा नव्हता, तर तो विद्वान, बुद्धिमान, संगीतकलेत निपुण आणि भगवान शंकरांचा परमभक्त होता. म्हणजे रावणाच्या चांगल्या गुणांचा इथं सन्मान केला जातो. तुम्हाला ही परंपरा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button