Latest

पुणे-अहिल्यानगर-संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे अजूनही कागदावरच ! मागील ६ महिन्यात नेमक काय झाल ?

पुणे-अहिल्यानगर-संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वेची घोषणा झाली, निधीची तरतूदही झाली… पण प्रत्यक्षात काम कुठे पोहोचलं ?
तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर ते पुणे या प्रस्तावित ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वेच्या भूसंपादनाला अद्याप सुरुवात झालेली नाही. मार्च २०२६ मध्ये भूसंपादन लवकर सुरू होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र सहा महिने उलटूनही ठोस हालचाल झालेली नाही.

१९२ किलोमीटरच्या या मार्गासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल १४ हजार ८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. करमाड ते ढोरेगाव हा ७० किलोमीटरचा भाग वगळता, ढोरेगाव ते शिरूरदरम्यान सुमारे १२२ किलोमीटरसाठी भूसंपादन आणि बांधकाम अपेक्षित आहे.

या प्रकल्पाची अलाइनमेंट अद्याप निश्चित झालेली नाही. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील भूसंपादन महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, विद्यमान छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे मार्गाची अवस्थाही खराब असून अनेक ठिकाणी रस्ता खड्डेमय आहे. या मार्गावर दररोज सुमारे २० हजार वाहनांची वर्दळ असते. एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार, भूसंपादनाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button