Latest

नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी ! १९ सप्टेंबरला मिळणार थेट कंपन्यांमध्ये संधी ! राज्यात २४ ठिकाणी रोजगार मेळावा, कुठे करणार नोंदणी?

शिक्षण पूर्ण झालंय… पण नोकरीची संधी मिळत नाहीये? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे! मित्रांनो, राज्यातील शिक्षित बेरोजगार आणि महाविद्यालयीन तरुणांना कॉर्पोरेट आणि औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारकडून विशेष रोजगार महाकुंभ आयोजित केला जाणार आहे.

येत्या १९ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ होणार आहे. राज्यातील २४ प्रमुख ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, विविध कंपन्या आणि औद्योगिक संस्थांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. यापूर्वी नोंदणीकृत उमेदवारांना ७ दिवसांचे प्री-प्लेसमेंट ट्रेनिंग दिले जाणार आहे.

यात मुलाखतीचे तंत्र, संवादकौशल्य आणि कॉर्पोरेट वातावरणासाठी आवश्यक तयारी केली जाईल. नोकरी मिळाल्यानंतरही गरजेनुसार पोस्ट-प्लेसमेंट ट्रेनिंग दिले जाणार आहे.

कंपनीत जॉइनिंग होईपर्यंत प्रशासनाकडून पाठपुरावाही केला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवर, रोजगार केंद्रात किंवा दिलेल्या QR कोडद्वारे नोंदणी करावी.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button