Latest

भोंदू अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यावर! जामीन मिळणार का ? उज्ज्वल निकमची भूमिका काय?

आजच्या सुनावणीत अशोक खरातला जामीन मिळणार की पुन्हा कारागृहातला मुक्काम वाढणार? महिला लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज नाशिक न्यायालयात सुनावणी होत आहे. खरातने एसआयटीचा तपास पूर्ण झाल्याचा दावा करत जामीन देण्याची मागणी केली आहे.

मात्र, सरकारी पक्षाने त्याच्या जामिनाला विरोध केला आहे. या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम शासनातर्फे बाजू मांडत असून, त्यांनी खरातला जामीन देऊ नये, अशी भूमिका न्यायालयासमोर मांडली आहे.

एसआयटीने यापूर्वी आठ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. अन्य काही प्रकरणांचाही तपास वेगवेगळ्या यंत्रणांकडून करण्यात आला आहे. ईडीकडूनही या प्रकरणाशी संबंधित चौकशी झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, शिर्डीतील काही हॉटेल्समध्ये महिलांच्या शोषणासंदर्भात चर्चा सुरू असली, तरी या दाव्यांबाबत अधिकृत तपासाची माहिती स्पष्ट झालेली नाही. आता आजच्या न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button