Latest

वीज गेली आणि अंधारात भयंकर घडलं…; आई-बाबांच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत ! अकोलेत नेमक काय घडलं ?

अकोले तालुक्यातील मोग्रस येथे सर्पदंशामुळे पाच वर्षीय ऋत्वी दीपक गायकरचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ऋत्वी घरात झोपलेली असताना विषारी सापाने तिच्या हाताच्या बोटांना दंश केला. सापाने काही काळ तिचे बोट तोंडात पकडून ठेवल्याने अनेकदा दंश झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनेच्या वेळी घरातील वीजपुरवठा खंडित होता. सर्पदंशानंतर पृथ्वीला तातडीने संगमनेर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारांसाठी नाशिकला हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर मोग्रस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांत अकोले तालुक्यात सर्पदंशामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढत असल्याने ग्रामीण भागात जनजागृती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button