Latest

नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! १ ऑक्टोबरपासून टाटा मोटर्सची ‘ही’ वाहनं महागणार ! किती वाढणार किंमती ?

टाटा मोटर्सने आपल्या सर्व व्यावसायिक वाहनांच्या किमतींमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून १ टक्क्यापर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्येक मॉडेल आणि व्हेरियंटसाठी दरवाढीचे प्रमाण वेगवेगळे असणार आहे.

कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि इतर उत्पादन खर्चाचा परिणाम भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादनासोबतच वाहतूक आणि लॉजिस्टिक्सचा खर्च वाढल्याने वाहनांच्या किमतीवरही त्याचा परिणाम होत आहे.

महत्त्वाचं म्हणजे, याच वर्षातील व्यावसायिक वाहनांच्या किमतीतील ही दुसरी वाढ आहे. याआधी १ एप्रिलला किमतींमध्ये १.५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

त्यामुळे ट्रक, बस आणि छोट्या व्यावसायिक वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसह ट्रान्सपोर्टर्सना ऑक्टोबरपासून अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. दरम्यान, इतर काही प्रमुख ऑटो कंपन्यांनीही यापूर्वी वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button