
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत तब्बल ४ ते ५ लाख पात्र शेतकऱ्यांचा समावेश होऊ शकतो.
विशेष म्हणजे, यावेळी राष्ट्रीयीकृत आणि खासगी व्यापारी बँकांमधील कर्जदार शेतकऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील सुमारे ४० ते ५० हजार प्रलंबित खात्यांचाही समावेश होण्याची माहिती आहे.
यादीला विलंब होण्यामागे बँकांकडून आलेल्या माहितीतील तांत्रिक त्रुटी, दंडव्याजाचा प्रश्न, संयुक्त कर्जखाती, आधार लिंकिंग आणि नावांच्या स्पेलिंगमधील चुका अशी कारणं सांगण्यात आली आहेत.
आतापर्यंत १६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे, तर सुमारे ४ लाख ४४ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे.
या तिसऱ्या यादीनंतर नियमित कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांची संख्या २६ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.





