
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी श्रीगोंदा तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुते, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप आणि जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी आपापल्या पातळीवर तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
राहुल जगताप यांची कोंडी करण्यासाठी राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून राजेंद्र नागवडे आणि विक्रमसिंह पाचपुते यांचे मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राहुल जगताप यांना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
दत्तात्रय पानसरे हेही शांतपणे अर्चना पानसरे यांच्यासाठी चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, श्रीगोंदा सहकारी सोसायटी मतदारसंघातून राहुल जगताप विरुद्ध प्रतापसिंह पाचपुते अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.
या सगळ्या राजकीय समीकरणांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचाही प्रभाव पडू शकतो. श्रीगोंद्याच्या जिल्हा बँक निवडणुकीत अखेर बाजी कोण मारणार ? आपलं मत कमेंटमध्ये नक्की मांडा.





