Latest

पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी दिली मोठी बातमी ! महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार? ‘या’ तारखा आताच नोट करून घ्या

ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अनेक भागांत खरीप पिकांवर संकट निर्माण झालं असून, आता सर्वांचं लक्ष आभाळाकडे लागलं आहे.

दरम्यान, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार १३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या काळात राज्यातील विविध भागांत दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

विशेषतः विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो. गणेशोत्सवाच्या काळातही काही भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याआधी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

दरम्यान, हवामान विभागानेही ७ सप्टेंबरला महाराष्ट्रासह अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत वादळी वाऱ्याची शक्यताही आहे.

मात्र, हा अंदाज आहे; स्थानिक परिस्थितीनुसार पावसात बदल होऊ शकतो. शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button