अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका कधीकाळी शांत आणि सांस्कृतिक होता. पण संगमनेर शहर सध्या कोणत्या दिशेने चाललंय..? हा प्रश्न पडतोय.गेल्या काही दिवसांत संगमनेरमध्ये ज्या काही धक्कादायक घटना समोर आल्या आहेत, त्या पाहता एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतोय… संगमनेरमधील काही ठराविक टोळ्या ड्रग्ज आणि गोमांसाची विक्री करून जाणीवपूर्वक शांतता भंग करताहेत का? तरुणांना जाणूनबुजून नशेच्या आहारी ढकलताहेत का? या टोळ्यांनी चालवलेली समाजविघातक कृत्य एका मोठ्या विनाशाची पायाभरणी तर ठरणार नाही ना..? पोलिसांचं काम आता वाढलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संगमनेर ते सुकेवाडी रस्त्यावर शनिवारी तब्बल १७०० किलो गोमांसाची तस्करी पकडली. त्यापूर्वी संगमनेर बसस्थानकावर एम.डी.ड्रग्जची विक्री करणारा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गोमांस तस्करीवर पोलिसांनी मर्यादा आणताच, या कसायांनी आता तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार सुरू केलाय, हे उघड झालं. याच धक्कादायक विषयावरचा धक्कादायक रिपोर्ट आपण सविस्तर समजून घेऊयात…
शनिवारी, स्थानिक गुन्हे शाखेनं संगमनेरमध्ये एक मोठी कारवाई केली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, सुकेवाडी ते समनापूर रस्त्यावरून गोमांसाची अवैध वाहतूक केली जात आहे. पोलिसांनी सापळा रचला आणि एका संशयास्पद पिकअप वाहनावर थेट छापा टाकला.या कारवाईत तब्बल 1700 किलो गोमांस आणि पिकअप वाहन असा एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अब्दुल हमीद अहमद कुरेशी (वय 23, रा. जमजम कॉलनी, संगमनेर), कलामुद्दीन मिज्जन खान (वय 28, रा. संगमनेर), वाहनचालक अरबाज फिरोज खान (वय 24, रा. सिद्धार्थनगर, ता. शिरुर, जि. पुणे) आणि कैश शबनूर इनामदार (वय 23, रा. संजयनगर, श्रीरामपूर) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.. या चारही जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हा प्रश्न इथेच संपत नाही. ही कारवाई फक्त एका मोठ्या हिमनगाचे टोक आहे.
सुकेवाडीतील या कारवाईच्या दोन दिवस आधी, म्हणजेच गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संगमनेरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एसटी बसस्थानक परिसरात शहर पोलिसांनी आणखी एक मोठा दणका दिला. पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की, कासिफ असद कुरेशी (वय २७, रा.कादरी मशिद, भारतनगर, संगमनेर) हा तस्कर तिथं महागडं ‘एम.डी.’ ड्रग्ज विकण्यासाठी दबा धरून बसला होता. पोलिसांनी त्याला त्याच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३९ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज व सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता विचार करा, एका बाजूला गोमांसाची तस्करी आणि दुसऱ्या बाजूला थेट बसस्थानकावर तरुण मुलांना नशेच्या जाळ्यात ओढणारं घातक ड्रग्ज! स्थानिक सूत्रांनी आणि वृत्तपत्रांनी उपस्थित केलेला दावा अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे जेव्हा संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांवर आणि गोमांस तस्करीवर मर्यादा आल्या, तेव्हा यातील ‘काही’ कसायांनी चक्क आपला मोर्चा अंमली पदार्थांच्या व्यापाराकडे वळवला? हा प्रश्न आज प्रत्येक संगमनेरकराला पडला आहे.
हा प्रकार अचानक सुरू झालेला नाही. जर आपण गेल्या वर्षभरातील संगमनेरमधील कारवायांचा आलेख पाहिला, तर संगमनेर हे अवैध अंमली पदार्थांचे आणि गोमांस तस्करीचे केंद्र बनत चालले आहे की काय, अशी भीती वाटते.
-काही महिन्यांपूर्वी नाशिक टास्क फोर्स आणि स्थानिक पोलिसांनी सुकेवाडी परिसरातच मोठी संयुक्त कारवाई केली होती. तिथे तब्बल ४५६ किलो सुका गांजा जप्त करण्यात आला होता, ज्याची किंमत १ कोटी २५ लाख रुपये इतकी होती. या प्रकरणात बाप-लेकावर गुन्हा दाखल झाला होता.
-सुकेवाडीच्या कारवाईनंतर अवघ्या २४ तासांत शहर पोलिसांनी पुन्हा छापा टाकून ३२ किलो सुका गांजा आणि ८ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार जणांना अटक केली होती.
-त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही संगमनेरमध्ये पोलिसांनी सव्वाचार किलो गांजासह तिघांना ताब्यात घेतलं होतं.
-याशिवाय गोव्यातील बनावट दारूचे कारखाने, घरात चालणारे बनावट दारूचे धंदे आणि स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा-मावा तस्करीवर केलेले छापे ही तर नित्याचीच बाब झाली आहे.
एका छोट्याशा तालुक्याच्या शहरात कोट्यवधींचा गांजा, लाखो रुपयांचे एम.डी. ड्रग्ज आणि टनावारी गोमांस सापडणे, हे कशाचे संकेत आहेत? या सर्व कारवायांचा आणि गुन्ह्यांचा जर आपण संबंध जोडला, तर चित्र अत्यंत भयावह आहे. आज संगमनेरमधील शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसर नशेखोरांच्या विळख्यात सापडल्याची तक्रार खुद्द स्थानिक व्यापारी आणि नागरिक करत आहेत. पण सर्वात मोठा आणि मूळ प्रश्न हा आहे की, हा केवळ पैशांसाठी केला जाणारा बेकायदेशीर धंदा आहे की यामागे संगमनेर आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याची सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था जाणीवपूर्वक भंग करण्याचा काही जाणीवपूर्वक कट रचला जात आहे? गोमांस वाहतूक करणारे आणि ड्रग्ज विकणारे आरोपी एकाच साखळीचे भाग आहेत का? पोलिसांनी एका टोळीवर कडक मर्यादा आणल्यानंतर ते तातडीने दुसऱ्या घातक गुन्ह्याकडे कसे वळतात?स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर पोलीस सध्या या प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत. पण नागरिक म्हणून आपल्यालाही जागृत राहावं लागेल. आपल्या आसपास अशा संशयास्पद हालचाली दिसत असतील, तर तातडीने प्रशासनाला कळवा. कारण जर आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्या घरातील तरुण पिढी या ड्रग्जच्या आणि गुन्हेगारीच्या गर्तेत कधी ओढली जाईल, हे सांगता येणार नाही…





