Latest

महाराष्ट्रातील ओल्ड मॉन्कच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी! मुंबई हायकोर्टाने दिला मोठा निर्णय, राज्यात Old Monk मिळणार की नाही?

Old Monk बाबत नवीन अपडेट समोर आली आहे. मंडळी, ‘ओल्ड मॉन्क’ रमच्या महाराष्ट्रातील विक्रीवरील वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उत्पादन करणाऱ्या कंपनीला सध्या कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.

कंपनीने अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या म्हणजेच एफएसएसएआयच्या आदेशाला आव्हान देत, महाराष्ट्रातील विक्रीवरील बंदी स्थगित करण्याची मागणी केली होती.

मात्र, न्यायालयाने या टप्प्यावर विक्री सुरू करण्याची परवानगी देणे म्हणजे अंतिम निकालापूर्वीच दिलासा देण्यासारखे ठरेल, असे निरीक्षण नोंदवले.

दरम्यान, कंपनीने सुधारित उत्पादन लेबलची तीन नमुने न्यायालयासमोर सादर केली आहेत. केंद्र सरकार आणि एफएसएसएआयने त्यावर भूमिका मांडण्यासाठी वेळ मागितला आहे.

हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला? खोपोली येथील उत्पादन केंद्राच्या तपासणीनंतर एफएसएसएआयने लेबलिंगबाबत आक्षेप घेतला. उत्पादनात बाहेरून रमचा स्वाद वापरला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आता पुढील सुनावणी ८ सप्टेंबरला होणार असून, त्यानंतर या प्रकरणात काय दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button