Latest

अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीतील चूक महागात पडली; पानसरेनंतर आता नाहटांनाही धक्का; अविश्वास ठराव मंजूर!

श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाळासाहेब नाहटा यांच्याविरोधातील अविश्वास ठराव तब्बल १७ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला.

संघाच्या २१ संचालकांपैकी १७ जण बैठकीला उपस्थित होते. नाहटांसह चार संचालक अनुपस्थित राहिले. संचालक अंकुश आहेर यांनी अविश्वास ठराव मांडला, तर पोपटराव सोनवणे यांनी त्याला अनुमोदन दिले.

उपस्थित सर्व १७ संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने नाहटांना सभापतीपद गमवावे लागले. विशेष म्हणजे, एका आर्थिक फसवणूक प्रकरणात नाहटा अटकेत आहेत.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत दत्तात्रेय पानसरे यांना साथ दिल्यामुळे नाहटांवर कारवाई झाली का, अशी राजकीय चर्चा श्रीगोंद्यात रंगली आहे. पानसरेनंतर नाहटांनाही राज्यस्तरीय पद गमवावे लागल्याने श्रीगोंद्याच्या राजकारणात पुढे काय घडणार, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button