Latest

जावयाने सासऱ्यालाचं दिला मोठा धक्का ! १९२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने केलेत लंपास, नगरच्या घटनेची अख्या जिल्ह्यात चर्चा!

सासऱ्याच्या घरातील सोन्यावरच जावयाची नजर पडल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरात समोर आला आहे. निंबळक येथील चंद्रशेखर विलास शिंदे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तेजस मारुती परदेशी याने फिर्यादीच्या मुलीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर घरातील तब्बल १९२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तिच्याकडून घेतले.

या दागिन्यांमध्ये नेकलेस, बांगड्या, गंठण, कानातले, अंगठ्या आणि चेनचा समावेश होता. या सोन्याची अंदाजे किंमत ४ लाख ५० हजार रुपये असल्याचं तक्रारीत नमूद आहे.

मात्र, विश्वासाने घेतलेल्या या दागिन्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. नोव्हेंबर २०२५ ते ११ सप्टेंबर २०२६ या काळात हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहकले पुढील तपास करत आहेत. आपल्या माणसावर ठेवलेला विश्वासच असा महागात पडल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button