
श्री क्षेत्र भगवानगडावर दसऱ्याच्या मुहूर्तावर नवे महंत गादीवर विराजमान होत आहेत. कृष्णा महाराज शास्त्री गडाचे चौथे महंत होणार आहेत. पण कोण आहेत? कृष्णा महाराज. सांगतो. आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भगवानगडावर २० ऑक्टोबरला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळा पार पडतोय. कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे चौथे महंत म्हणून गादीवर विराजमान होत आहेत. कृष्णा महाराज शास्त्री मूळचे तेलंगणातील आहेत. त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले आहे.
सुमारे १७ वर्षांपूर्वी ते भगवानगडावर आले. येथे त्यांनी ज्ञानेश्वरी विद्यापीठात बारा वर्षे अध्ययन केलं. त्यानंतर एकनाथवाडी येथील निरंजन संस्थानचे महंत म्हणूनही त्यांनी धार्मिक कार्याची जबाबदारी सांभाळली. विद्यमान महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते धार्मिक विधींनुसार गादी हस्तांतरण होणार आहे.
मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे भव्य आयोजन टाळून सोहळा साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तुमच्या मते, भगवानगडाची परंपरा पुढे नेण्यात कृष्णा महाराज शास्त्री यांची भूमिका किती महत्त्वाची ठरेल? कमेंटमध्ये सांगा.





