Latest

धक्कादायक ! हुंड्यासाठी छळ, मुलीच्या मृत्यूनंतर आईचा आक्रोश…; अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं ?

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, असा गंभीर आरोप तिच्या आईने केला आहे. या प्रकरणात पतीसह सासरच्या नातेवाईकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेवगाव येथील अफ्रोजा युनूस शेख यांची मुलगी शिफा हिचा विवाह १९ नोव्हेंबर २०१८ रोजी अल्ताफ अन्सार शेख याच्याशी झाला होता. लग्नासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, विवाहानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी शिफाचा छळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

प्रकृती खालावल्यानंतर शिफाला भिंगार, अहिल्यानगर आणि त्यानंतर पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, १९ ऑगस्ट २०२६ रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

यानंतर तिच्या आईने अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देत संबंधितांविरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर मग मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button