Latest

बिबट्याची इतकी दहशत की ऊसतोड कामगारांना करावे लागत आहे स्थलांतर; 12 वर्षाच्या मुलावर हल्ला कुठे घडली घटना ?

नेवासा फाटा परिसरातील भालगाव-गोधेगाव भागात सध्या बिबट्याने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिवराज रवींद्र शिंदे या 12 वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केला.

उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवराजवर झडप घातली. मात्र, सोबत असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने पळ काढला आणि मुलाचे प्राण थोडक्यात वाचले.

या जीवघेण्या हल्ल्यात मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे तीव्र वातावरण पसरले आहे. जीव वाचवण्यासाठी ऊसतोड कामगारांनी आपल्या कुटुंबासह या भागातून स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत, परंतु बिबट्या त्यांना चकवा देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पहाटे फिरणारे नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button