Latest

साईभक्तांसाठी मोठी बातमी ! नाशिक-शिर्डी रेल्वे प्रकल्पाबाबत शासनाचे नवीन आदेश जारी, कसा आहे प्रकल्प ? जाणून घ्या

नाशिकहून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नाशिक रोड ते साईनगर शिर्डी रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत नवीन आदेश जारी झाले आहेत. काय आहेत नवीन आदेश ?

जाणून घेऊयात. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, या प्रकल्पासाठी राहाता आणि कोपरगाव तालुक्यांतील जमिनींची संयुक्त मोजणी करण्याचे आदेश शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी दिले आहेत.

राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे आणि डोऱ्हाळे, तर कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी, जवळके, चांदेकसारे, बहादरपूर, शहापूर, पोहेगाव बुद्रुक आणि बहादराबाद या गावांतील जमिनींचे संपादन होणार आहे.

मोजणीदरम्यान शेतजमीन, विहिरी, झाडे आणि बांधकामांची अचूक नोंद घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

मात्र, रेल्वेकडून अद्याप मोजणीचा अर्ज दाखल झालेला नसल्याची माहिती भूमिअभिलेख विभागाने दिली आहे. तर मग मंडळी तुम्हाला रेल्वेचा हा प्रकल्प कसा वाटला ? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button