Latest

चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली आणि त्यानंतर नको तेच घडलं… अहिल्यानगरच्या तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार !

नोकरीवरून काढण्याची भीती, आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि चेहऱ्यावर अॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी देत एका 23 वर्षाच्या तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना अहिल्यानगर मधून समोर आली आहे. नेमक प्रकरण काय? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

अहिल्यानगरच्या रामचंद्र खुंट परिसरातील गोल्डन सलूनमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित २३ वर्षीय महिला या सलूनमध्ये ब्युटीशियन म्हणून काम करत होती. तक्रारीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये आरोपीने तिचा विनयभंग केला. त्यानंतर धमक्या देऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. मार्च महिन्यात महिलेचा विवाह झाला.

मात्र, त्यानंतरही आरोपीने घरी येऊन धमकावल्याचं तक्रारीत नमूद आहे. अखेर पीडितेने पतीला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्याच्या पाठिंब्याने पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सलून मालक जावेद अल्ताफ शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तर मग मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button