
शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने रब्बी हंगामातील सहा पिकांच्या हमीभावात वाढ केलीय. पण, कोणत्या पिकांचा एमएसपी किती रुपयांनी वाढला ? जाणून घेऊयात. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी नव्या दरांनुसार, करडईच्या हमीभावात सर्वाधिक ६७५ रुपये वाढ झाली असून, नवीन दर ७ हजार २१५ रुपये प्रति क्विंटल आहे. मोहरीचा हमीभाव ६ हजार ६१३ रुपये, मसूर ७ हजार ३९० रुपये, बार्ली २ हजार २८६ रुपये, हरभरा ५ हजार ९२८ रुपये, तर गव्हाचा हमीभाव २ हजार ६१० रुपये करण्यात आला आहे. यामध्ये गव्हाला केवळ २५ रुपये, तर हरभऱ्याला ८३ रुपयांची वाढ मिळाली आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रातील दुष्काळामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. सरकारी खरेदी केंद्रांवर विक्री करताना येणाऱ्या अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे माल विकावा लागतो. तर मग मंडळी ही हमीभाववाढ शेतकऱ्यांसाठी पुरेशी आहे का? कमेंट करून नक्की सांगा !





