Latest

कर्जत-जामखेडच अवघडचं आहे… नेत्यांचा अख्ख्या महाराष्ट्रात दबदबा; पण स्वतःच्या मतदारसंघात तब्बल इतक्या दिवसाआड पाणी !

राज्याच्या राजकारणात राम शिंदे आणि रोहित पवार यांच मोठं वजन आहे. पण त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच संघर्ष करावा लागतोय. नेमकी कशी आहे कर्जत-जामखेडची परिस्थिती ? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, जामखेड शहरात तब्बल १२ ते १५ दिवसांनी एकदा, तेही फक्त तासभर पाणी मिळतंय. भुतवडा, मोहरी आणि खैरी या तीन तलावांनीही तळ गाठलाय. त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठा कसा करायचा, हा प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे.

कायमस्वरूपी उपाय म्हणून उजनी पाणीपुरवठा योजनेची चर्चा होतेय. मात्र, ही योजना पूर्ण व्हायला आणखी दीड ते दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.

एवढंच नाही, तर शहरात घाण, धूळ, मोकाट कुत्रे आणि डुकरांचा त्रासही वाढलाय. कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांसह रेडकू जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर मग मंडळी, तुम्हाला हा विषय कसा वाटला कमेंट करून नक्की सांग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button