
भारत हिंदू राष्ट्र होईल, अंडरवर्ल्ड डॉनचा खात्मा आणि जगात तिसरं महायुद्ध होणार… अशा अनेक मोठ्या भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. नेमकी कुठे झाली ही भाकणूक आणि त्यात आणखी काय सांगितलंय? ते सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
कर्नाटकातील निपाणी तालुक्यातल्या आप्पाचीवाडी-कुर्ली इथं श्री हालसिद्धनाथांची यात्रा गुरुवारी, २९ ऑक्टोबरला उत्साहात पार पडली. या यात्रेत सिद्धार्थ डोणे महाराज यांनी पारंपरिक भाकणूक केली. त्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.
या भाकणुकीत भारत हिंदू राष्ट्र होईल, अंडरवर्ल्ड डॉनचा खात्मा होईल आणि जगात तिसऱ्या महायुद्धामुळे निष्पाप लोकांचे बळी जातील, असं सांगण्यात आलं.
याशिवाय तापमानवाढीचा धोका, भारतात दुष्काळ, नद्या कोरड्या पडणं आणि पिण्याच्या पाण्यासाठी आणीबाणी निर्माण होण्याचे संकेतही देण्यात आले. तर मग मंडळी, तुम्हाला या भाकणुकीबद्दल काय वाटतं ? कमेंट करून नक्की सांगा !





