Latest

अहिल्यानगरमधील साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा २४ वा हफ्ता जमा… कोणत्या तालुक्यात किती शेतकरी?

अहिल्यानगर जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता अखेर खात्यात जमा झाला आहे. नेमकं किती पैसे मिळाले आणि कोणत्या तालुक्याला सर्वाधिक लाभ झाला, सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील तब्बल ५ लाख ४४ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले. म्हणजेच एकूण १०८ कोटी ९५ लाख रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांना मिळाला आहे.

आता तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर संगमनेरमध्ये सर्वाधिक ५८ हजार ५७६ शेतकऱ्यांना ११ कोटी ७९ लाख रुपये मिळाले. तर नेवाशातील ५३ हजार ५३१ शेतकऱ्यांना १० कोटी ७० लाख रुपये मिळाले.

श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ झाला आहे. तर मग मंडळी, तुम्हाला हा दोन हजारांचा हप्ता मिळाला का? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button