
थकीत वीजबिलामुळे वीजपुरवठा बंद केला, म्हणून चक्क वायरमनला बेदम मारहाण करण्यात आली. एवढंच नाही, तर पळून जात असताना त्याला कारखाली चिरडण्याचाही प्रयत्न झाला. नेमकं प्रकरण काय? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, संगमनेर खुर्दमध्ये महावितरणचे २४ वर्षीय वायरमन ओंकार भानुदास सातपुते वरिष्ठांच्या आदेशानुसार थकीत वीजबिलासाठी वीजजोड तोडायला गेले होते.
वीजपुरवठा बंद करून ते निघत असतानाच अजीज उर्फ बाबू छोटू कुरेशी आणि मोबीन शाकीब कुरेशी यांनी त्यांना अडवलं. दुचाकीची चावी काढून घेतली आणि शिवीगाळ करत मारहाण केली.
कसाबसा जीव वाचवून सातपुते पळू लागले, तर दोघांनी कारने त्यांचा पाठलाग केला. दोन वेळा कारखाली चिरडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांनी बाजूला उडी घेतल्याने अनर्थ टळला.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.





