Latest

वाढदिवस असो किंवा राजकीय शक्तिप्रदर्शन…आता अहिल्यानगरमध्ये फ्लेक्स लावता येणार नाहीत ? कधीपासून होणार अंमलबजावणी ?

शहरात कुठेही पाहिलं तरी नेत्यांचे वाढदिवस, शुभेच्छा आणि राजकीय जाहिरातींचे फ्लेक्स दिसतात. पण आता याच फ्लेक्सवर कायमची बंदी येण्याची शक्यता आहे. महापालिकेने नेमका काय निर्णय घेतलाय, सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, अहिल्यानगर शहर फ्लेक्समुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व प्रकारच्या फ्लेक्सवर बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी यासंदर्भात पत्र दिलं होतं. तसंच उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेतील आदेशांचाही आधार घेण्यात आला आहे.

कारण विनापरवानगी लावले जाणारे फ्लेक्स शहराचं विद्रुपीकरण करत आहेत. वाढदिवस, सण-उत्सव आणि राजकीय जाहिरातींसाठी ठिकठिकाणी बॅनर लावले जातात. ते काढण्यासाठी महापालिकेचं मनुष्यबळही खर्च होतं. काही ठिकाणी धोकादायक कमानींमुळे अपघाताचा धोकाही निर्माण होतो.

मात्र, हा प्रस्ताव अद्याप महासभेच्या मंजुरीसाठी आहे. त्यामुळे आता महासभा काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागलं आहे. तर मग मंडळी, तुम्हाला या प्रस्तावाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button