
शेतीत सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाची जबाबदारी… अखेर या संकटांनी एका शेतकऱ्याचं आयुष्य संपवलं. पारनेर तालुक्यातील ही घटना मन सुन्न करणारी आहे. नेमकं काय घडलं ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, बाभुळवाडे गावातील ५३ वर्षीय दीपक शंकर खणकर यांनी बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली.
दीपक खणकर यांच्याकडे अवघी दीड एकर जिरायत शेती होती.
या शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही कठीण झालं होतं. त्यात सोसायटी, पतसंस्था आणि खासगी सावकाराकडून घेतलेलं जवळपास दहा लाख रुपयांचं कर्ज होतं.
बुधवारी पत्नी आणि दोन्ही मुलं रोजंदारीसाठी बाहेर गेले असताना ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. पारनेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. तर मग मंडळी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा.





