
मंडळी, आकाश दुबय्या हत्याकांड प्रकरणात आता सागर बेग यांनी एक वेगळाच दावा केला आहे. दारूच्या धंद्यामुळेच हे सगळं घडलं आणि हे त्याच्या पापाचे भोग आहेत, असं ते म्हणाले. त्यांनी नेमकं काय सांगितलं, सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, सागर बेग म्हणाले, या प्रकरणानंतर पाच दिवस श्रीरामपूर बंद ठेवण्यात आलं होतं. डीजी साहेबांनी येऊन चौकशी केली, मात्र या हत्याकांडाशी माझा कुठलाही संबंध जोडण्यात आला नाही.
पुढे त्यांनी संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे गायब झाल्याचा आरोप केला. तिथे ड्रग्सचा व्यापार चालत असल्याचा संशयही व्यक्त केला. मुलांना हॉटेलमध्ये दारू पाजण्यात आल्याचा दावा करत, या सगळ्याची चौकशी व्हायला हवी होती, असं ते म्हणाले.
विशेष म्हणजे, त्या ठिकाणी सुरू असलेल्या दारूच्या व्यवसायामुळेच हे तरुण मृत्युमुखी पडल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, हे सगळं त्या माणसाच्या पापाचे भोग आहेत.
आता चार्जशीट कोर्टात दाखल झाल्यानंतर आपल्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचंही सागर बेग यांनी स्पष्ट केलंय. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.





