
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील काही सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. पण या निर्णयामागचं कारण काय? सांगतो त्या आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी दुष्काळ निवारण आणि मदतकार्याला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शासनाने दिली. निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी गुंतले, तर शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यावर परिणाम होऊ शकतो.
मात्र, या निर्णयातून काही संस्थांना वगळण्यात आलंय. सहकारी गृहनिर्माण संस्था, न्यायालयाचे स्पष्ट आदेश असलेल्या संस्था आणि २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेल्या संस्थांच्या निवडणुका सुरू राहणार आहेत.
विशेष म्हणजे, अहिल्यानगरसह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा बँकांच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या नाहीत. कारण या निवडणुकांमध्ये आता फक्त मतदान बाकी आहे. तर मग मंडळी तुम्हाला सरकारचा हा निर्णय कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.





