Latest

पारनेर तालुक्यातून जाणाऱ्या ‘या’ महत्त्वाच्या महामार्गाचे काम रखडले! आ. दातेंनी स्पष्ट केली यामागील कारणे….

पारनेर तालुक्यातून जाणाऱ्या शिरूर-बेल्हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७६१ चे काम संथ भूसंपादनामुळे रखडल्याचा गंभीर आरोप आमदार काशिनाथ दाते यांनी केला आहे.

कामाची मुदत संपूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे कोट्यवधी रुपयांचा हा रस्ते प्रकल्प रखडला आहे.महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जमीन अद्याप उपलब्ध झालेली नाही.

पारनेर तालुक्यातील पाडळी आळे, निघोज, जवळा यासारख्या १२ गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया विविध टप्प्यांवर प्रलंबित आहे. अनेक गावांचे भूसंपादन निवाडे अद्याप गॅझेटमध्ये प्रसिद्ध न झाल्याने रस्ते विभागाचे काम खोळंबले आहे.

या सर्व प्रकारावर संताप व्यक्त करत आमदार दाते यांनी प्रांताधिकारी चिंचकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विकासकामांची ही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी या विलंबाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय सुस्तीमुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि प्रवाशांचे हाल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button