Latest

श्रीरामपूरकरांवर दिवाळीतच पाणीसंकट! पाण्यासाठी करावी लागणार आता आठ दिवस प्रतीक्षा

दिवाळीतच श्रीरामपूरकरांवर पाणीसंकट ओढावले आहे.ऐन सणासुदीत पाणी कपातीचा सामना करावा लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाटबंधारे विभागाने पाण्याचे पुढील आवर्तन थेट १५ डिसेंबरला सोडण्याचे नियोजन केल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

उपलब्ध पाणी जपून वापरण्यासाठी पालिकेने आता आठ दिवसांतून फक्त एकदाच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांना पाण्याचे नियोजन करावे लागत असून, टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

सध्या शहरात टँकरच्या पाण्यासाठी प्रतिलिटर ३ रुपये ५० पैसे दर आकारला जात आहे, ज्यामुळे जनतेवर आर्थिक भार पडत आहे.
साठवण तलावाचे काम अपूर्ण राहिल्याने ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

लोकप्रतिनिधींनी जलसंपदामंत्र्यांकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यावर सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button