
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत २४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात १७१ मिमी पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा ७५ मिमी अधिक पाऊस होऊनही अनेक भागांतील पाणीटंचाई कायम आहे.
ऑगस्टमध्येही जिल्ह्यात तब्बल १०० टँकर सुरू असून, त्यातून १ लाख ९५ हजार ३२१ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे यापैकी फक्त ४ टँकर शासकीय, तर ९६ टँकर खासगी आहेत.
तब्बल ५०९ वाड्या-वस्त्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकर सुरू आहेत. पुढील काळात दमदार पाऊस झाला तर भूजलपातळी वाढून टँकरची गरज कमी होऊ शकते.
मात्र, पावसाने दडी मारल्यास टंचाईचे संकट आणखी लांबण्याची शक्यता आहे. तुमच्या भागात अजूनही टँकरने पाणी येतेय का? कमेंटमध्ये सांगा.





