Latest

श्रीगोंद्याच्या ‘या’ नामांकित हॉस्पिटलवर गंभीर आरोप ! मुख्यमंत्री साहाय्यता निधीवर डल्ला… कागदपत्रांमध्ये मोठा घोळ !

गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी सरकारकडून मिळणाऱ्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या कागदपत्रांमध्येच घोळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात हा प्रकार घडलाय? नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण? सगळं सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, श्रीगोंद्यातील मातोश्री हॉस्पिटलवर बनावट एमआरआय रिपोर्ट आणि रुबी हॉल क्लिनिकच्या अनधिकृत लेटरहेडचा वापर केल्याचा आरोप आहे.

जुलै २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या काळात काही रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर मुख्यमंत्री साहाय्यता निधी मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्यात आले. मात्र, कागदपत्रं आणि बिलांबाबत संशय निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने रुबी हॉल क्लिनिककडे विचारणा केली.

अंतर्गत चौकशीत संबंधित कागदपत्रं अनधिकृत असल्याचं आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर क्लिनिकच्या सुरक्षा विभागाने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. विक्रम भोसले यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका मांडली आहे. या प्रकरणात तुमचं मत काय ? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button