Latest

१६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर….; अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाचं रंगणार ‘श्री गणेश महापुराण कथा’ ! कुठे आणि कसे असणार कार्यक्रमाचे स्वरूप ? पहा….

अहिल्यानगरकरांसाठी गणेशोत्सवात यंदा मोठा भव्य आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘श्री गणेश महापुराण कथा’ या कार्यक्रमाचे आयोजन १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. दररोज दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही कथा होणार आहे.

या कार्यक्रमाचे कथाकार युग प्रवर्तक, क्रांतिकारी आणि राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जाणारे डॉ. श्री इंद्रदेवरानंद सरस्वतीजी महाराज (वृंदावनवासी) आहेत. गणेश महापुराणाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक ज्ञान, भक्ती आणि संस्कारांचा अनुभव घेता येणार आहे.

विशेष म्हणजे, कथासप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच असा भव्य कार्यक्रम होत असल्याने नगरकरांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे.

त्यामुळे भाविकांनी कुटुंबासह या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून भव्य धार्मिक सोहळ्याचा नक्कीच आस्वाद घ्यावा. ठिकाण : बंधन लॉन्स, ‘डी’ मार्टच्या पाठीमागे, नगर-मनमाड हायवे, सावेडी, अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button