
महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना विहिरीसाठी थेट चार लाख आणि ठिबकसाठी ९७ हजार रुपयाचे अनुदान देत आहे. पण ही योजना नेमकी कोणती आहे ? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून दोन महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना.
या योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी ४ लाख, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी १ लाख, तर ठिबक सिंचनासाठी ४७ हजार ते ९७ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत. यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, आधारशी जोडलेलं बँक खाते, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र आणि जमिनीचे सातबारा व आठ-अ उतारे यांसारखी आवश्यक कागदपत्रं असणं गरजेचं आहे.
अर्ज महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन करावा लागतो. पूर्वसंमतीनंतर सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते आणि मंजूर अनुदान थेट बँक खात्यात जमा होतं. मंडळी तुम्हाला या योजनेची माहिती होती का? हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.





