Latest

श्रीरामपूर अन राहुरीकरांनो लग्न जमवतांना सावधान… तालुक्यात सुरु आहे बनावट लग्नांचा असा धक्कादायक प्रकार ! नेमक काय घडतंय ?

लग्नासाठी नवरी शोधताय ? मग सावधान ! अहिल्यानगरच्या राहुरीत बनावट लग्नांच्या रॅकेटचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, राहुरी तालुक्यातील कणगर आणि श्रीरामपूरमधील अशोकनगर येथील तीन तरुणांना लग्नाचं आमिष दाखवून तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका एजंट महिलेने एका तरुणाकडून चार लाख, तर इतर दोन तरुणांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेतल्याचं समोर आलं.

विशेष म्हणजे, तिन्ही तरुणांची लग्नंही लावून देण्यात आली. मात्र, लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच तिन्ही नववधूंनी वेगवेगळी कारणं सांगून घर सोडलं.

नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना टाळाटाळ करणारी उत्तरं मिळाली. अखेर १९ ऑक्टोबर रोजी शिर्डीत आलेल्या त्रिशला भारत खिल्लारे या कथित एजंट महिलेला ग्रामस्थांनी पकडलं आणि राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे? कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button